औरंगाबाद लोकसभा ;भुमरे-जलील मध्ये लढत खैरे तिसऱ्या क्रमांकावर

Aurangabad Lok Sabha; Bhumre-Jalil contest, Khaire third

 

 

 

 

लोकसभा निवडणूक 2024 यंदा अतिशय महत्त्वाची आहे. कारण पक्षा पक्षांमधील मतभेद, बंडखोरी आणि त्यातून नवीन पक्षांची स्थापना त्यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघ यावेळी चर्चेत आले.

 

 

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहिला मिळाली. एमआयएम पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील,

 

 

 

एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात प्रमुख लढत झाली. आतापर्यंत जे आकडे हाती आले आहेत त्यानुसार

 

 

 

औरंगाबाद लोकसभा : 4थी फेरी अंतिम संदिपान भुमरे हे 6021 मतांनी आघाडीवर
संदिपान भुमरे (शिंदे गट) – 70455
इम्तियाज जलील (MIM) – 64434
चंद्रकांत खैरे (उद्धव ठाकरे गट) – 48297

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट –
संदिपान भुमरे हे 6021 मतांनी आघाडीवर52 दरवाजांचं मराठवाड्याच्या राजधानीचं शहराचे चंद्रकांत खैरं तब्बल 20 शिवसेनेचे खासदार होते.

 

 

 

तर गेल्या पाच वर्षांपासून  एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या ताब्यात आहे. 1999, 2004, 2009 आणि 2014 असे चार टर्म चंद्रकांत खैरे खासदार झालं खरं पण पाचव्यांदा त्यांचा पराभव झाला. आता खैरे सहाव्यांदा त्याचं नशिब आजमावत आहेत.

 

 

 

2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंह पवारांचा 33 हजार मतांनी पराभव केला. तर 2014 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटलांना दीड लाख मतांनी धुळ चारली. मात्र 2019 मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना केवळ 4 हजार 400 मतांनी मात केली.

 

 

 

 

देशाची कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर प्रत्येक अपडेट – मध्य प्रदेशात भाजप विरोधकांना क्लीन स्वीप देण्याच्या मार्गावर; देशभरातील निकाल कुणाच्या बाजुनं?

 

 

 

त्या वेळच राजकीय चित्र पाहता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या 2 लाख 83 हजार मतांमुळं खैरेंचा पराभव असं राजकीय विश्लेषकांचं मत होतं. यंदा लोकसभा निवडणुकीत 63.07 टक्के मतदान केलं. हा आकडा पाहता  संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत पाहिला मिळतेय.

 

 

 

 

 

या मतदारसंघातही शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका उमेदवारी निवडताना दिसून आला. खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हता.

 

 

 

 

 

 

 

पण संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली पण त्यांना प्रचार करण्यास कमी वेळ मिळाला. संभाजीनगरमधील मतदारांबद्दल बोलायचं झालं तर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाज नाराज होता.

 

 

 

 

त्यामुळे संभाजीनगर खैरेंना सहाव्यांदा विजयाचा ताज चढवतील की जलील पुन्हा खासदार होईल हे चित्र काही वेळात स्पष्ट होईल.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *