IPS अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडून जीवन संपवले

The IPS officer ended his life by shooting himself with a revolver

 

 

 

 

आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

 

पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला, त्याच्या काही मिनिटांतच चेतिया यांनी रुग्णालयातच आत्महत्या केली. चेतिया हे २००९ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी होते.

 

 

 

त्यांनी कथितपणे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जिथे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तिथेच आपल्या अधिकृत रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडून घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

 

आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी चेतिया यांच्या मृत्यूची माहिती दिली. चेतिया यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांतच

 

 

 

त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण आसाम पोलीस कुटुंब त्यांच्या निधनाने शोकसागरात बुडालं आहे, असंही डीजीपी जीपी सिंह म्हणाले.

 

 

 

शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली. चेतिया यांच्या आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची घोषणा केली.

 

 

 

त्या दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. संपूर्ण आसाम पोलीस कुटुंबावर या घटनेने शोककळा पसरली आहे, असं आसाम पोलीस प्रमुख म्हणाले.

 

 

 

२००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया हे गेल्या चार महिन्यांपासून रजेवर होते. ते आपल्या पत्नीच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी त्रस्त होते.

 

 

आसाम सरकारमध्ये सचिव होण्यापूर्वी शिलादित्य चेतिया यांनी राज्यातील तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून काम पाहिले होते.

 

 

 

पोलिस सध्या त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहेत. चेतिया यांच्या पत्नी कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. जिथे मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *