अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीत भाजप करणार नांदेडमधील पराभवाचे चिंतन

In the absence of Ashok Chavan, BJP will reflect on the defeat in Nanded

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी नांदेडमध्ये येणार आहेत.

 

 

 

 

भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी ते बैठक देखील आहेत, मात्र या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जनता नाराज झाली होती,

 

 

 

त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका देखील भाजप उमेदवाराला बसला होता. या सर्व कारणांमुळे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. मराठवाड्यात भाजपाला यश आलं नाही.

 

 

 

दरम्यान, प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व तालुक्यांचा दौरा पूर्ण केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही

 

 

 

पराभवामागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पराभवाचं नेमकं कारण शोधण्यासाठी पक्षाने प्रत्येक मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

 

 

 

याच अनुषंगाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार रावसाहेब दानवे पक्ष निरीक्षक म्हणून शनिवारी नांदेडला येणार आहेत. सकाळी अकरा वाजता विश्रामगृहात भाजप नेत्यांची

 

 

 

 

आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पराभवाची कारणे जाणून घेणार आहेत. विशेष म्हणजे या चिंतन बैठकीला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण हे मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

मागील कार्यकर्त्यांच्या आभार बैठकीत भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. महानगराध्यक्षाने निवडणुकीत काम केले नाही, तेव्हा नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा,

 

 

अशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष बालाजी पुयड यांनी केली. या विषयावरून दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयडमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. तेव्हा पक्ष निरीक्षकाच्या बैठकीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी शनिवारी पक्ष निरीक्षकाच्या उपस्थितीत भाजपाची चिंतन बैठक होणार आहे.

 

 

 

 

मात्र नांदेडमध्ये होणाऱ्या बैठकीत खासदार अशोक चव्हाण उपस्थित राहणार नाहीत. काही खाजगी कामानिमित्त आपण मुंबईला जाणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. मुंबईत आपण दोन्ही निरीक्षकांकडे आपलं मत मांडणार असल्याचे ल अशोक चव्हाण म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *