जरांगेच्या सभेचा दारू दुकानदारांना फटका
Liquor shopkeepers hit by Jarange's meeting
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, दि. 7 डिसेंबर, 2023 रोजी डिग्रस पाटी ता.जि. हिंगोली येथे श्री. मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आहे.
त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवार,
दि. 7 डिसेंबर, 2023 रोजी फक्त औंढा नागनाथ व हिंगोली तालुक्यातील सर्व प्रकारच्या ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्य विक्री (एफएल-2, एफएल-बीआर-2, एफएल-3, सीएल-3) व ताडी अनुज्ञप्त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे (कोरडा दिवस) आदेश दिले आहेत.
या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक करण्यात येईल याची संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.