48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा
Heavy rain warning in 48 hours
महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडाकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज
तर उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी
आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे. पेरणी केलेली शेती बहरली आहे. कोरडे पडलेल्या नदी-नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरीसह कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून
हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर पोहोचले असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. खेड शहरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरुन वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहण्यास खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी
धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरू नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुसरीकडे खेड शहरात सखल भागात पाणी साचले असून शिवतर मार्गावर अरुंद गटारांमुळे पाणी रस्त्यावरती येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.
पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाले मात्र सद्यस्थितीत पावसाने उसंत घेतल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
#हवामानअंदाज
कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज तर उद्या (२३) कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.#WeatherUpdate pic.twitter.com/FRScUmhvfZ— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2024