अजित पवार AMIM,वंचित सोबत तिसरी आघाडी करणार ?

Ajit Pawar will form a third alliance with AMIM, Vanchit?

 

 

 

 

अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे.

 

 

अशातच आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवारांनी अमित शाहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर, काय परिस्थिती असेल यावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजते.

 

या भेटीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे मतं कमी असताना देखील त्यांच्या दोन उमेदवारांचा विजय झाला.

 

 

याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भेटीत विधानपरिषद निवडणुकीबाबत झाली चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला होता.

 

राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) मत कमी असताना देखील त्यांच्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाल्याने मिळालेल्या वाढीव मतांवर बैठकीत चर्चा झाली.

 

महायुतीतील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर काय परिस्थिती असेल यावर देखील झाली चर्चा. जर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वतंत्र निवडणूक लढवली

 

 

 

तर राष्ट्रवादीला जास्त मत मिळू शकतील अस काही नेत्यांच म्हणण आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात अल्पसंख्यांकांची

 

 

10 ते 22 टक्के मत आहेत त्यातील जास्तीत जास्त मत राष्ट्रवादीला मिळू शकतात असा पक्षातील काही नेत्यांचा मतप्रवाह आहे.

 

अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय…वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे.

 

भाजपची ही नवीन खेळी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

 

यासंदर्भात भुजबळांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं तर आम्हाला तिस-या आघाडीची गरज नसल्याचं धर्मरावबाबा अत्रामांनी म्हटलंय.

 

तर तिस-या आघाडीबाबत अद्यापपर्यंत आम्हाला प्रस्ताव आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास आपण सकारात्मक आहोत असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय.

 

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली असून, आता आणखी एका राजकीय बदलाचे संकेत स्पष्टपणे मिळताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे, अजित पवार येत्या काळात

 

तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार

 

करण्याची तयारी आहे. छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असून, ही भाजपची नवीन खेळी असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

एकिकडे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

एकूणच येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला विजय निश्चित करायचा असल्यामुळे त्याच दृष्टीकोनातून ही पावलं टाकली जात असल्याचं म्हटलं जात आहे.

 

प्राथमिक स्तरावर महायुतीतून अजित पवार यांनी स्वतंत्र आघाडी तयार करून एमआयएम, वंचित यांना एकत्र घेऊन त्यांची एक आघाडी तयार करायची

 

आणि असं केल्यास मविआच्या मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्यानंतर महायुतीला हा फायदा मिळून तिसऱ्या आघाडीमुळं राजकीय समीकरणं बदलू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार तिसऱ्या आघाडीतील मंत्रीपदं आणि त्यापुढील गणितं नंतर ठरवली जाणार असून, या सर्व परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे अस्वस्थ झाले असून,

 

त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. एकिकडे पवारांवर निशाणा साधत 12 तासांच्या आत त्यांचीच भेट घेण्यासाठी जाण्याचा भुजबळांचा निर्णय पाहता एक मोठी राजकीय घडामोड राज्यात पाहायला मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

 

अजित पवारांसमवेत वेगळी आघाडी असून, त्या माध्यमातून मतांची फाटाफूट करण्यासाठी कैक समीकरणं सध्या बदलताना दिसत आहेत.

 

 

भुजबळ जेव्हा अजित पवारांसमवेत गेले होते तेव्हा ओबीसी नेते अशी आपली ओळख रहावी असा त्यांचा स्पष्ट प्रयत्न होता. वारंवार सरकारमध्ये राहून मराठा आरक्षण

 

 

आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली मतं ठामपणे मांडली. जर तिसरी आघाडी अस्तित्वात येत असेल आणि त्यात वंचित,

 

एमआयएम आणि बच्चू कडू, सदाभाऊ खोत असे पक्ष सोबत असतील तर भुजबळांचं स्थान अप्रत्यक्षरित्या कमी होताना दिसत असून, मधल्या काळातील त्यांची नाराजी पाहता कुठेतरी याच भूमिकेतून थोरल्या पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जाऊ शकतं,

 

महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी अवघे 100 दिवसही उरलेले नसताना दोन मोठे नेते भेटणं पाहता तिसरी आघाडी झाल्यास भुजबळांच्या

 

स्थानाला धक्का लागणं अपेक्षित असून, ही राजकीय अस्वस्थता असल्याचं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यामुळं आता खरंच ही तिसरी आघाडी अस्तित्वात येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *