आमदाराकडून आपली हत्या होण्याची भीतीने खळबळ
Excitement due to the fear of being killed by the MLA
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी समाजमाध्यावर आपली हत्या होण्याची भीती व्यक्त गेल्या आठवड्यात केली होती.
या संदर्भातील पोस्टमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस दलातील अंगरक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. किणीकर यांनी
आपल्या सुरक्षेतील पोलिसांवर निष्काळजीपणाबाबत ठपका ठेवत ठाणे पोलिस आयुक्तांकडे नाराजीवजा तक्रार केल्याचे खुद्द किणीकर यांनी सांगितले आहे.
मागील आठवड्यात पालिकेत आमदार किणीकर यांनी मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध विकासकामांबाबत बैठक घेतली होती.
मात्र या बैठकीतून बाहेर पडताना काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांनी किणीकर यांना अप्रत्यक्ष धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतरच किणीकर यांनी समाजमाध्यमावर या घटनेविषयीची पोस्ट केली होती.
गेल्या अडीच वर्षांपासून सुरक्षेसाठी सात ते आठ पोलिसांच्या अंगरक्षकांचे विशेष पथक त्यांच्यासोबत असते. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पडताना केवळ एकच पोलिस अंगरक्षक होता.
त्यावेळी इतर सात ते आठ पोलिस पालिकेच्या विविध भागांत बसले होते. त्यामुळे पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याचे किणीकर यांनी म्हटले आहे.
त्या दिवशी पालिकेबाहेरील गर्दीचे आणि इतर सर्व सीसीटीव्ही फुटेजची आपण मागणी केली आहे. त्यानुसार संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी
त्या तरुणांची चौकशी आणि कामात कसूर करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी किणीकर यांनी केली आहे.