३५ हजारांची लाच घेतांना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले
A police officer was caught red-handed while accepting a bribe of 35 thousand
एका व्यक्तीचे पैसे वसूल करण्यासाठी त्याच्याकडून एक लाख रुपयांची लाच मागणारे टिळक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक
दीपक बागुल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी अटक केली. बागुल यांना ३५ हजार रुपये घेताना पकडण्यात आले.
ठराविक मुदतीत पैसे दुप्पट करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या ओळखीतल्या महिलेला २७.५० लाख रुपये दिले. या महिलेने ही रक्कम पतसंस्थेत गुंतवल्याचे सांगितले. दुप्पट रक्कम करण्याची योजना फसली
आणि या महिलेची रक्कम दुप्पट होऊ शकली नाही. त्यामुळे या व्यक्तीने तिच्याकडे आपले पैसे परत मागितले. महिलेने या व्यक्तीला १० लाख रुपये परत केले,
मात्र उर्वरित १७.५० लाख रुपये परत देण्यास ती टाळाटाळ करू लागली. या व्यक्तीने पत्नीसह पंतसंस्थेचे कार्यालय गाठले.
तरीही ही महिला पैसे देत नव्हती. उलट या महिलेनेच ही व्यक्ती आणि त्याच्या पत्नीविरुद्ध टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. त्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक बागुल यांना आपलीच रक्कम या महिलेकडे असल्याचे सांगितले.
साडे सतरा लाखाची रक्कम वसूल करून देतो, पण त्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील, असे बागुल यांनी सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने या व्यक्तीने एसीबीकडे याबाबत तक्रार केली.
एसीबीने तक्रारीची शहानिशा केली आणि सापळा रचला. या सापळ्यात ३५ हजार रुपये घेताना बागुल यांना पकडण्यात आले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली असून लाचेची ३५ हजार रक्कम हस्तगत केल्याची माहीती एसीबीच्या अधिकाऱ्याने दिली.