एम फिल पात्रताधारक प्राध्यापकांना पदोन्नती व इतर अनुषंगिक लाभ पूर्ववत ठेवण्याची मागणी

Demand for reinstatement of promotion and other fringe benefits to M Phil qualified professors

 

 

 

 

एम फिल  पात्रताधारक प्राध्यापकांना पदोन्नती व इतर अनुषंगिक लाभ पूर्ववत ठेवण्याची मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ,

 

संघटनेद्वारे पाटील याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राज्यभरातील अहर्ताधारक प्राध्यापकांच्या समस्येवर शेवटचे समाधान काढून सर्व प्राध्यापकांना नेट सेट मधून सूट मिळवण्यासाठी प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविण्याचा आपण निर्णय घेतला ,

 

त्यानुसार संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्याकडे सर्व विद्यापीठांनी छाननी समितीचे गठन केले
या समितीने प्राप्त प्रस्ताव शासनाने दिलेल्या सूचनानुसार

 

तपासून घेत ते योग्य शेऱ्यासह अग्रेषित करण्यात आलेले आहेत सदर प्रक्रियेतून शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव पूर्णतः तपासलेले व वैध असल्याची खातरजमा विद्यापीठाने केलेली आहे

 

या प्रस्तावाना अंतिम मान्यता मिळवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा गठीत समितीचा अहवाल देखील आवश्यक आहे

 

परंतु या प्रक्रियेसाठी पुन्हा काही कालावधी लागणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यास पुन्हा आचारसंहितेच्या जाळ्यात सर्व प्राध्यापक अडकण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे विद्यापीठांनी शिफारस केलेले व संचालक कार्यालयास अग्रेषित केलेले प्रस्ताव तत्वतः मान्य करून प्राध्यापकांच्या स्थाननिश्चिती प्रक्रियेवर लावलेले अलिखित निर्बंध काढून ज्या प्राध्यापकांना विद्यापीठाने नियमित मान्यता दिलेली आहे

 

त्यांना शासनाच्या अटी व शर्तीचे अधीन राहून ताशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र घेऊन कॅसचे लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे महासंघाचे निवेदनात करण्यात आलेली आहे

 

उच्च स्वतंत्र शिक्षण मंत्री अजित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना शिष्टमळाद्वारे भेटून हे निवेदन देण्यात आले.

 

यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे प्रांत अध्यक्ष प्रदीप खेडकर,प्रांत महासचिव वैभव नरवाडे प्रांत उपाध्यक्ष प्रा. डॉ. संतराम मुंडे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *