खासदारांनी 10 वर्ष संसदेत जाऊन काय केले ?; गणेशराव दुधगावकर
What did MPs do after 10 years in Parliament?; Ganesh Rao Dudhgaonkar
परभणी लोकसभा मतदार संघातील उमेदवरांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे,सर्वच उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर दुधगावंकर यांच्या प्रचारार्थ बोलतांना माजी मंत्री गणेशराव दुधगावकर म्हणाले,
जिल्ह्यातील मतदारांनी कधीच जातीवाद केला नाही आणि करणारही नाहीत.असे असताना यंदा सर्वच सर्वच राजकिय पक्षाकडून जाती धर्माचे राजकारण केले जात आहे,हे चुकीचे आहे परंतु राजकीय खेळीला जिल्ह्यातील मतदार थारा देणार नाहीत
परभणी लोकसभा निवडणुकीत सध्या मतांच्या धुर्वीकरणासाठी प्रमुख राजकीय पक्षाकडून जातीवाद करुन समाजात वाद निर्माण केले जात आहे.यावर गणेशराव (बापुसाहेब) दुधगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक जातीधर्मातील नेत्यांना प्रतिनिधीत्व देणारा हा जिल्हा असताना यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकिय पक्षाकडून जाती धर्माचे राजकारण केले जात आहे.
त्यामुळे समाजात धुर्वीकरण होऊन दुषीत वातावरण निर्माण करण्याचे काम राजकीय पक्षाकडून केले जात असल्याचा आरोप गणेशराव दुधगावकर यांनी केला आहे.
सध्याचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका करतांना खासदारांनी 10 वर्ष संसदेत जाऊन काय केले ?असा प्रश्न उपस्थित करत .संसदेत प्रश्नच मांडले नसल्याने ते सुटणार कसे ?
जिल्ह्यात एकही नवीन उद्योग,सिंचन प्रकल्प आणता आला नाही,10 वर्षे आमदार 10 वर्षे खासदार म्हणून काम करत असताना एक तरी मोठ काम सांगा असे आव्हान दुधगावकर यांनी दिले .
मतासाठी जातीवाद करुन निवडणुका जिंकता येत नसतात असे सांगताना दुधगावकरांनी भाजपावर निशाना साधला ,ते म्हणाले,महायुतीचे उमेदवाराचे जिल्ह्यात काहीच नसताना
तसेच भाजपा देखील आताकुठे जिल्ह्यात रुजु लागली आहे.त्यामुळे एवढ्या दुरच्या व्यक्तीला केवळ जातीच्या आधारावर उमेदवारी दिली आहे हे अजिबात पटणारे नाही.मतांसाठी जातीवाद करु नका,हे मोठ्या पक्षाला शोभत नसल्याचे भाजपला सुनावले.