आमदार रत्नाकर गुट्टे यांची विजयासाठी केविलवाणी धडपड ?
MLA Ratnakar Gutte's struggle for victory?
-
डॉ.मुजीब शेख /९४२१०८२७८४
गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आपल्याला पुन्हा विजयाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवेल याची स्वप्न पडत आहेत, हे त्यांच्याच वक्तव्यावरून दिसत आहे
मध्यप्रदेशात ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आले ,तसेच महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार या योजनेमुळे पुन्हा सत्तेत येणार असल्याचे वक्तव्य गुट्टे यांनी, आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांच्या मेळाव्यात केले
आता गुट्टे यांच्या या वक्तव्यावरून सर्वसामान्य मतदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पाच वर्षे आमदारकीच्या काळात जर मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असते, तर आज गुट्टे यांना बहिणीच्या कुबड्या वर अवलंबून राहण्याची वेळ निश्चितच आली नसती ?
त्यामुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली ? असे म्हणायचे काय? असा प्रश्न पडतो आहे . विधानसभा निवडणुकीचा मौसम सुरू झाला आहे, गंगाखेड मतदार संघातून रासपकडून गुट्टे यांना उमेदवारी हवी आहे ,
जाणकरांचा रासप हा महायुतीतील एक घटक पक्ष आहे. गुट्टे यांना रासपची त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे
मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून त्यांना प्रचंड विरोध होत आहे,गुट्टे यांना होणार हा विरोध त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून गुट्टे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम न करण्याचा सार्वजनिक रित्या थेट इशाराच ,भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे
त्याची चर्चा आता जिल्ह्याभरात होत आहे . विशेष म्हणजे गुट्टे यांच्याकडून रासपाचा संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्या दृष्टिकोनातून त्यांनी जिल्ह्यातील तसेच परभणी महानगरपालिकेत विजयासाठी कंबर कसली होती
परंतु आता त्यांची स्वतःच्याच विजयासाठी दमछाक होताना दिसत आहे. गंगाखेड मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार हे आतापर्यंतच्या राजकीय चित्रावरून दिसत आहे.
2019 च्या निवडणुकीत मतदारांनी तुरुंगात असणाऱ्या गुट्टे यांना आमदार बनवले, पण आज त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून होणारा हा विरोध म्हणजे ते मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत हेच दाखवते
2019 ची विधानसभा निवडणुक आणि आताची 2024 ची निवडणूक ,या दोन्हीमध्ये मतदारांच्या मूडमध्ये मोठा बदल झालेला आहे ,याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलेली आहे
तोच पॅटर्न विधानसभेलाही राहिला तर गुट्टे यांच्या विजयाची वाट खडतर होणार ? हे चित्र सध्या दिसत आहे ,गुट्टे यांना विधानसभा निवडणुकीत दोन बाजूनी लढावे लागणार आहे,
एक महाविकास आघाडीचा विरोधक उमेदवार आणि दुसरे महायुतीतील भाजपचे नाराज स्थानिक नेते, प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीतील नेत्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश येईल काय ?
भाजपचे स्थानिक कार्यकर्त्यांना गुट्टेना महायुतीतून उमेदवारी देण्यात आली तरीही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील काय ? स्थानिक पदाधिकारी प्रचारात विरोधात असतील तर गुटेंच्या अडचणींमध्ये मोठी भर पडणार आहे
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता ,तोच उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडी देण्यात येणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे
गेल्या निवडणुकीत गुट्टे यांना ओबीसी सोबतच दलित आणि मुस्लिम मतांची ही रसद ही मिळाली होती, मात्र या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना मिळेल काय ?
हा मोठा प्रश्न आहे . गुट्टे यांनी पाच वर्षात या समाजासाठी कोणते भरीव योगदान दिले ज्यामुळे हा समाज गुट्टे यांना मतदान देईल, असा प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चिला जात आहेत
एकंदरीत गुट्टे यांना अंतर्गत महायुतीत होणारा अंतर्गत विरोध आणि समोर महाविकास आघाडी सारखे भक्कम आव्हान पाहता आमदार रत्नाकर गुट्टे यांची निवडणुकीत विजयासाठी हि केविलवाणी धडपड ?असल्याचेच दिसत आहे,एवढे मात्र खरे !